Sunday, 15 September 2013
Tuesday, 3 September 2013
ऑक्टोबरआधीच काढा इन्शुरन्स!
विमा नियामक आणि विकास
प्राधिकरणाची (आयआरडीए) नवी मार्गदर्शक तत्त्वे पुढील महिन्यापासून लागू
होणार आहेत. त्यामुळे सध्याच्या अनेक लाइफ इन्शुन्स पॉलिसीमध्ये बदल होणार
असून, त्यावर सर्व्हिस टॅक्स लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इन्शुरन्स
पॉलिसी घेण्यासाठी सप्टेंबर महिना महत्त्वाचा आहे.
'आयआरडीए'ने फेब्रुवारीमध्ये यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले होते. त्याची अमलबजावणी ही ऑक्टोबरपासून होणार आहे. त्यानुसार इन्शुरन्स कंपन्यांना सध्याच्या अनेक पॉलिसीची फेरआखणी करावी लागणार आहे. यासंदर्भातील काम सुरूही झालेले आहे. नव्या निकषांचा फटका हा विमाधारकाला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमिअम वाढू शकतो, तर अनेक वैशिष्ट्ये ही कमी होऊ शकतात. या संदर्भात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) पुणे विभाग १ चे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक ए. पी. कुलकर्णी म्हणाले, 'ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या 'आयआरडीए'च्या नव्या निकषांचा परिणाम हा सध्याच्या अनेक इन्शुरन्स पॉलिसीवर होईल. निकषांनुसार सध्या इन्शुरन्स पॉलिसीची फेरआखणी सुरू आहे. त्यामुळे काही वैशिष्ट्ये काढून टाकली जाऊ शकतात, तर काही पॉलिसीदेखील बंद होऊ शकतात. त्यामुळे नवा इन्शुरन्स काढण्याच्या दृष्टीने सप्टेंबर महत्त्वाचा महिना आहे.'
सध्या काही इन्शुरन्स पॉलिसीवर सर्व्हिस टॅक्सची आकरणी होत आहे. मात्र, अशा पॉलिसीची संख्या मर्यादित आहे. नव्या बदलानुसार ऑक्टोबरनंतर जारी होणाऱ्या बहुतेक सर्व इन्शुरन्स पॉलिसीवर सर्व्हिस टॅक्स आकरला जाणार आहे. 'पॉलिसीचा काळ हा वीस ते २५ वर्षांच्या पुढील असतो. ऑक्टोबरमध्ये इन्शुन्स मोठ्या प्रीमिअमची पॉलिसी काढल्यास सर्व्हिस टॅक्समुळे तीन ते पाच लाख रुपयांचा फरक पडू शकेल. त्यामुळे सप्टेंबरमध्ये इन्शुरन्स काढणे हिताचे ठरू शकते,' असे इन्शुरन्स तज्ज्ञ अजय खोले यांनी सांगितले.
'इन्शुरन्समध्ये एक प्रकारचा करार करण्यात आलेला असतो. त्यामुळे एखादी पॉलिसी बंद झाली, तरी त्याचे लाभ हे ज्यांच्याकडे पॉलिसी आहे, त्यांना मिळतात. यापूर्वी 'एलआयसी'ने काही योजना बंद केल्या होत्या. मात्र, त्याचे पूर्ण लाभ हे संबंधित इन्शुरन्सधारकाला मिळत आहेत,' असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
बंद पडलेली पॉलिसी सुरू कराइन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमिअम काही कारणाने भरणे थांबल्यास पॉलिसी बंद होते. मात्र, अशी बंद पडलेली पॉलिसी सुरू करून घेण्यासाठी 'एलआयसी'ने योजना जाहीर केली आहे. त्यानुसार संबंधित इन्शुरन्सधारकास सवलत दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

Sunday, 1 September 2013
निवृत्ती नियोजन काळाची गरज
निवृत्ती नियोजन काळाची गरज
जीवनात आपण स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घेत असतो आणि आपल्या कुटुंबीयांना चांगले आयुष्य जगता यावे यासाठी धडपड करत असतो. मात्र, आपल्या निवृत्तीनंतर आपण कसे आयुष्य जगू याचे नियोजन करतो का?
भारतीयांचा विचार केल्यास त्यांच्यासाठी निवृत्ती नियोजनाचे आयुष्यात खूप महत्त्व आहे. त्याची काही कारणे अशी -
सक्तीच्या पेन्शनचा अभाव : भारतातील बहुसंख्य लोक हे व्यावसायिक असतात किंवा असंघटीत क्षेत्रात काम करतात. त्यांना राज्य सरकार किंवा नोकरी देणार्या कंपनीकडून कोणत्याही प्रकारच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही.
आयुष्याकडून वाढलेल्या अपेक्षा : आपल्या आयुष्याकडून आपल्या अपेक्षा वाढतच आहेत. लवकर निवृत्त होण्याची स्वप्ने आपण पाहात आहोत. लवकर निवृत्ती म्हणजेच निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा टप्पा अधिकाधिक असणे.
विभक्त कुटुंब पद्धतीचे वाढते प्रमाण : ‘द फ्युचर ऑफ रिटायरमेंट रिपोर्ट-इंडिया फॅक्ट शीट - २०११’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार ३२ टक्क्यांहून अधिक लोक निवृत्तीनंतर आपल्या मुलांसोबत राहू इच्छितात.
भारतात ही संख्या जागतिक सरासरीच्या जवळपास दुप्पट आहे. मात्र, खासकरून शहरी भागात विभक्त कुटुंब पद्धतीचे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे आणि त्यामुळेच प्रत्येकाला आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आतापासूनच तरतूद करून ठेवावी लागणार आहे.
जगण्यासाठी लागणार्या खर्चाचा वाढता आलेख : वाढती महागाई, चांगले आयुष्य जगण्याच्या वाढत्या महत्वाकांक्षा, आरोग्यसेवांचे वाढते दर यांमुळे निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन करणे अनिवार्य झाले आहे.
निवृत्तीनंतर चांगले आयुष्य जगण्यासाठी याचे नियोजन लवकरात लवकर करणे आवश्यक आहे.
निवृत्तीचे नियोजन असे करा
पाऊल पहिले :
निवृत्तीनंतर आपल्याला चांगले आयुष्य जगण्यासाठी किती रक्कम लागणार आहे, हे ठरवा. मात्र, हे ठरवताना वाढणारी महागाई, आरोग्य सेवांचा वाढलेला खर्च, सुटय़ा आणि कुटुंबासाठी भेटवस्तू यांचाही विचार करून ठेवा. मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि किराया, जर तुमचे स्वतचे घर खरेदी केलेले असेल तर त्याचा खर्च गृहीत धरा.
पाऊल दुसरे :
निवृत्तीनंतरही तुम्ही ठरवलेले उत्पन्न मिळत राहावे यासाठी किती रक्कम हवी, याचे गणित मांडा.
पाऊल तिसरे :
यासाठी तुम्हाला नियमित किती रुपये बचत करावे लागतील, याचाही विचार करा. तुमच्याकडे जर वेळ असेल तर लगेच बचतीला सुरुवात करा.
पाऊल चौथे :
योग्य निवृत्ती योजनीची निवड करा. ज्यातून तुमच्या निवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण होतील.
पाऊल पाचवे :
निवृत्तीसाठी एक ठरावीक रक्कम आपल्या बँकेत दर महिन्याला फिक्स करत चला.

Subscribe to:
Posts (Atom)